एका 24 वर्षीय युवकाने राहता घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस येताच त्याला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान संबंधित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. प्रमोद माणिक मांढरे (24) रा घोडेघाट वार्ड पवनी असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.