महाराष्ट्र शासन ग्रामविकास पंचायत राज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद नाशिक च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विविध विभागातर्गत करावयाच्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.