आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेबाबत आज हरकती नोंदवण्यात आल्या. यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेला विरोध केला आहे. त्यावर आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३च्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालय येथे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.