जळगाव जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'सेवा पंधरवड्या'साठी जिल्हा परिषदेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पंधरवड्यात विविध शासकीय योजना आणि उपक्रमांचे कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. या नियोजनासाठी शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खा.स्मिता वाघ नवी दिल्लीतून थेट सहभागी झाल्या होत्या.