आष्टी मतदार संघातील सकुंडवाडी, हाकेवाडी आणि पिंपरी (घाटा) या गावांना आ. सुरेश धस यांनी शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भेट दिली. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या सर्व सोहळ्यांना आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.