करमाळा येथील सीना नदीवरील संगोबाचा पूल मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून, सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत माने यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी २८ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास करमाळ्यातील संगोबा पुल या ठिकाणी संवाद साधला आहे.