आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत प्रस्तावित 41 जिल्हास्तरीय योजनांचे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये समावेश करण्याबाबत प्रलंबित प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.