आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहन चालकांची तपासणी करत कारवाई केली आहे यामध्ये 7 अल्पवयीन वाहन चालकांना वाहनासह ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण 51 हजार रुपयांचा दंड वसूल करत त्यांच्या पालकांना यानंतर जर अल्पवयीन वाहन चालक आढळून आला तर अदखल पात्र गुन्हा दाखल करत कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला आहे