दि. 02 सप्टेंबर रोजी आयुष आयुर्वेदिक दवाखाना आमखेडा येथे श्रीगणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले, यामध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह,सिकलसेल,साय टी बी तसेच हॅन्ड हेल्ड एक्स रे मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णांची एक्स रे तपासनी करण्यात आली. शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले होते.