चिखली बसस्थानकावर वृद्ध महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली असून,चोरी केलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.या बाबत फिर्यादी महिला कासुबाई पांडुरंग खरात (वय ६५) आणि त्यांची मुलगी ज्योती सरदार ह्या दोघी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी चिखली येथील बसस्थानकावर आज आल्या होत्या.दुपारी सुमारे दीड वाजता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत,तीन अनोळखी महिलांनी फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची पोत, त्यात २ डोरले व २६ मणी होते.