भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आज शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत हे तोंडाला आग लागल्यासारखी भाषा वापरतात आणि नेहमीच त्यांना वाटतं की त्यांचे वलय जळते, असे कुलकर्णी म्हणाले. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव आराम करत असताना राऊत यांनी संभ्रम निर्माण करणारे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, काल उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला धनखड स्वतः उपस्थित होते.