राज्याचे राज्यमंत्री मा.इंद्रनील नाईक यांच्या पुसद,जिल्हा यवतमाळ येथील बंगल्यावर नॅशनल रुरल हेल्थ मिशनचे कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धडकले. यावळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “समायोजन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे!” “हल्ला बोल… हल्ला बोल!” असा प्रखर गजर परिसरात घुमला. अन्यायाविरुद्धचा हा एल्गार कर्मचारी चळवळीच्या लढाईला अधिक धार देणारा ठरला.