युवा सामाजिक कार्यकर्ते इमरोज भाई पटवेगर यांचा नॅशनल काँग्रेस पक्षात प्रवेश युवा सामाजिक कार्यकर्ते इमरोज भाई पटवेगर यांनी आज लातूर, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नांदेड येथील नक्षत्र बँक्वेंट हॉलमध्ये आयोजित या बैठकीत कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री तथा आमदार अमित भय्या देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.