मराठा आरक्षण जनजागरण फेरी व चलो मुंबईचे नियोजन शेटफळे गावातील सकल मराठा समाज बांधवांनी संघर्षयोद्धा मनोज जरागे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलन व आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आरक्षण जनजागरण फेरी काढली. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर गावातील जे संघर्षयोद्धे मुंबईला गेले आहेत. त्याचबरोबर जे जाणार आहेत त्या सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.