नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभे त.स. गावात सहा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गाडीचा कट मारल्याच्या कारणावर रमेश तेजमल भील यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी दुपारी सारंगखेडा पोलीस ठाण्यात पावबा भील रायबा भील सह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.