कोपरगाव तालुक्यातील मूर्शतपूर गावाचे सुपुत्र व नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले आबासाहेब शिंदे यांचा गावात दिमाखदार व जंगी सत्कार करण्यात आला. गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी व उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आज २२ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.