जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. आज दिनांक 3 बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदि कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त