आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत,बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 700 कर्मचारी व अधिकारी संपावर असल्याने आरोग्य यंत्रणा प्रभावी झाली आहे,मात्र अजूनही यांच्या मागण्या संदर्भात तोडगा निघाला नसल्याने आज 25 ऑगस्ट रोजी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले आहे.गेल्या 10 ते 15 वर्षांपासून बहुतांशी कर्मचारी हे आरोग्य विभागात सेवा देत आहेत.