तालुक्यातील खाडीपार येथील नाक्याजवळ 8 गोवंश मृत अवस्थेत पडून असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सदर प्रकार दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास उजेडात आला. मध्यरात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात गोतस्कराने मृत आठ गाई नाल्याजवळ फेकली असावे असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.