कोळकी ता. फलटण येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोघांपैकी एकाने हॉटेलमधील कामगाराच्या डोक्यात टपली मारल्यावरुन वाद होवून एकाने सळईने कामगाराला केलेल्या मारहाणीत हॉटेल कामगारांचा खून झाल्याची घटना घडली आहे. दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी शुक्रवारी सांगितले की गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल आमंत्रण कोळकी येथे अमोल वनारे (वय २८ रा. कोळकी) व त्याचा मित्र सलमान रफीक शेख (रा. सोनवडी) हे जेवण नेण्यास आले होते.