समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथिल खुर्सापार रस्त्यावरील राहुल गाठे यांच्या शेतातील बंड्यावर रहदारी असुन याठिकाणी गेल्या तिनं दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या नागाने दोन कोंबड्यांना ठार केले यामुळे येथील राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.काही करून हा नाग जागा सोडायला तयार नव्हता सर्पमित्र अमित शेडके यांनी बंडा गाठून मोठ्या शिताफीने सापाला जेरबंद केले.यावेळी सापाला जेरबंद करताच याठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास टाकला.