जव्हार पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी निलेश धांगडा याने शारिरिक करण्याची मागणी मुलीकडे केली, मात्र तिने नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली. आरोपी हत्या करून जव्हार येथील जंगलात पसार झाला. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शोध मोहीम राबवत आरोपीला जव्हार येथील जंगलातून अटक केली आहे.