मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी रोहित श्रीरंग लेंडवे, शोभा श्रीरंग लेंडवे, जयश्री रामदास पवार, रामदास दुर्योधन पवार (रा.मेथवडे) या चौघाविरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील बालविवाह लावणारी मुलगी ही १७ वर्षीय असल्याची कल्पना असतानाही वरील आरोपीने संगनमत करुन दि.२० मे २०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजता बालविवाह केला.