कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील रघुनाथ विठू जाधव वय 62 वर्ष हे दि.24 ऑगस्ट तुझी घराबाहेर पडले होते आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भाटेगाव शिवारातील उजवा कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे . सपोनि बसवंते ,जमादार संतोष नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे .याप्रकरणी आ .बाळापुर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद सायंकाळी घेण्यात आली आहे .