मोठे बाबांच्या घरी जाते, असे सांगून गेलेली १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी नांदुरा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. नांदुरा येथील शिवाजी हायस्कूलसमोर राहणारे रवी नंदू गोरले यांची मुलगी प्राची गोरले (१८) ही ६ सप्टेंबर रोजी मोठे बाबांकडे जाते, म्हणून घरातून बाहेर पडली. मात्र,बराच वेळ उलटूनही घराकडे परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा नातेवाइकांकडे शोध घेतला. परंतु,ती मिळून आली नाही.