वाशिम शहरात ईद ए मिलादुन्नबीनचा उत्सव दि. 5 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मीक वातावरणात साजरा करण्यात आला. पैगंबर मोहम्मद हजरत साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी लहांन मुलांनी हातात हिरवे ध्वज घेवून मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक सौदागर पुरा, जामा मस्जीद चौक मार्गे नबी साहाब मस्जीद पर्यंत काढण्यात आली. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व समाजबांधवांची उपस्थिती होती.