नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील अर्धवट झालेल्या कामाचा फटका आजूबाजूच्या वसाहतींना बसतोय. पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठं नुकसान झालंय. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचही मोठं नुकसान झालंय. या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत. नागरिकांना झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्याकडून घ्यावी अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे.