सोमवारी सकाळी ११ वाजता वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेचे विजयकुमार गाढवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.