आज दिनांक 12 सप्टेंबरला माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये नेर शहरातील निर्मल बंसी लोन येथे सभा पार पडली.यावेळी शासनाला सभेतून शेतकरी,शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या ज्वलंत समस्या मांडून कर्जमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली. या सभेला प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी मंचकावर माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.