प्रभानवल्ली गोसावी वाडी येथे नदी वहाळ पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना. शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता घडली होती. केतन श्रीपत खेगडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशासन, ग्रामस्थांनी शोध घेतला असता आज सकाळी ८:०० वाजता त्याचा मृतदेह गावातील सतीचा जाळ येथे आढळून आला.