बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोपीय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.यावेळी माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे सह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.