वारंगा फाटा ते नांदेड या रस्त्यावर डोंगरकडा शिवारात हादगाव ते नांदेड जाणारी बस क्रमांक एम एच 13 सि यु 69 88 च्या चालकांने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून शिवाजी दादाराव वाघमोडे हे आपल्या दुचाकी वर रस्त्याच्या कडेला बसले असता त्यांना जोराची धडक दिली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे .या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आ. बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सदर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी प्राप्त झाली आहे .