छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी 5 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास श्री तुळजाभवानी देवींचं दर्शन घेतले या वेळी कल्पनाराजे भोसले यांनी देवीची ओटी भरत कुलधर्म, कुलाचार केले तसेच आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला.