महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या काही पदाधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून हाकलून दिले आहे. पक्षाचे नियम व धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे खेडचे वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नळावडे आणि माणगाव (रायगड) येथील सुबोध जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाच्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले.