पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने २३ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडाचीवाडी येथील एचपी पेट्रोल पंपा समोर झालेल्या या अपघातानंतर भरधाव कंटेनर चालक तसाच पुढे पसार झाला.