नालासोपारा येथील एका ॲकॅडमीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने वाईट नजर ठेवत तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षक विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवून तिचा छळ व तिच्याशी गैरवर्तन करत होता. याबाबतची माहिती पीडित मुलीने पालकांना दिल्यानंतर पालक आणि नागरिक अकॅडमीमध्ये दाखल झाले आणि या आरोपी शिक्षकाला चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.