भारतीय सशस्त्र सैन्यात गौरवशाली इतिहास असणारी महार रजिमेंट च्या १९ व्या बटालियनमध्ये कार्यरत असलेले ग्राम काजळंबा ता.जि. वाशिम चे वीर सैनिक संतोष ढोके हे आपल्या मातृभूमी चे कर्तव्य बजावत असताना दिनांक : २७ ऑगस्ट २०१० रोजी अरुणाचल प्रदेश मधील टुटिंग (चायना बॉर्डर) वर शहीद झाले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी ग्राम काजळंबा या ठिकाणी त्यांचे शाहिद स्मारक बांधण्यात आले.