जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोंदिया शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आढावा बैठक पार पडली. सदर बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अडिटोरियमची स्थिती, नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, सुभाष गार्डनचे नूतनीकरण व प्रगती काम, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई, भूमिगत गटर अंडरग्राउंड कामातील निकृष्ट दर्जा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.