चांदिवली विधानसभेतील खैरानी रोड येथील श्री गजानन मित्र मंडळ गणेशोत्सव समितीच्या सदस्यांसोबत अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत मंडळाचे सदस्य बिनू कुमारन यांची दुःखद मृत्यू झाली. त्यांच्या परिवाराला आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास माजी खासदार पूनम महाजन यांनी भेटून त्यांनी त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या आणि आम्ही सर्व जण त्यांच्या सोबत आहोत असा त्यांना विश्वास दिला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक देखील उपस्थित होते.