कार पायावरून गेल्याचा बहाणा करून चोरट्यांनी चालकाला थांबवले. त्याला बोलण्यात गुंतवून कारमधील तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन चोरून पळ काढला.मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी सातच्या सुमारास विमाननगर चौकात ही घटना घडली. याबाबत एका ४१ वर्षीय वाहनचालकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.