भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या विशेष जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता एकोडी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करून हा कायदा रद्द करावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी साकोली यांना देण्यात आले. निवेदन देताना शैलेंद्र गणवीर राजू बडोले चेतन राऊत पी.जी.वसुले आनंद मेश्राम विकास सिडाम अशोक उके हरगोविंद बागडे यशवंत तिरपुडे महादेव तिरपुडे,उपस्थित होते