बुलढाणा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात ठाकरे गट शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी तालुक्यातील प्रत्येक मतदार संघातील नगरपरिषद, जिल्हा परिषद गट,व पंचायत समिती गण, माहिती दिली.