आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकींमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.