उमरखेड आणि महागाव तालुक्यात धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रचंड आवाजात डीजे चा वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या ही निर्माण होत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी एस.पी मुळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (१) नुसार डीजे वापरावर बंदी घालण्याच्या आदेश जारी केला आहे.