आजरा येथून मालवाहतूक टेम्पो मधून रोख रकमेच्या चोरी करणाऱ्या टोळीला इचलकरंजीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 13 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम, एक दुचाकी तीन मोबाईल हँडसेट असा एकूण 14 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज मंगळवार आठ जुलै सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.