राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय येथे लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या हेतूने या लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र गावित,रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त,संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या लोक दरबारात नागरिकांचे 230 तक्रार, समस्या अर्ज प्राप्त झाले.