गणशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या 'वर्षा' या मुंबईतील शासकीय निवासस्थानी 31 मार्च रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन घेतले.यावेळी आमदार महाले यांनी माझ्या जनतेला समृद्धी मिळावी, त्यांचे आयुष्य भरभराटीचे जावे आणि चिखली मतदारसंघात सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दिग्गज मान्यवर उपस्थित होते