हिंगणघाट ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले असून यासंबंधी तहसीलदार योगेश शिंदे व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यक बांधवासाठी शासनाने ०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुधारीत मानधनाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता, परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही असे नमूद करण्यात आले आहे.