पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा शिंदे आणि ग्रामसेवक अडसूळ साहेब यांनी ग्रामसभेत गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी थेट ग्रामसभा बंद करून पळ काढला गावकऱ्यांनी गावातील विकास कामांची स्पष्ट माहिती मागितली पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना उत्तरे देण्यास टाळले त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर बैठे आंदोलन सुरू केले आहे.