एटापल्ली तालुक्यातील गटटा आणि भामरागड तालुक्यातील कोठी गावांमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर गटटा ते कोठी या मार्गावर नवीन डांबरी रस्ता आणि पूल बांधायला शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे या दोन्ही गावांमध्ये ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.